आज १२ सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता मिळालेल्या माहितीनुसार धारणी तालुक्यातील हरीसाल येथे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या हरीसाल परिसरात वाघाच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आज वनविभागाची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गेल्या वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात ७ नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली...