अकोल्यात एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून तौहिद समीर बैद्य असं आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तौहिद याने अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत हा प्रकार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.