रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्ला शाखेतील अपहार करण्यात आलेल्या ५० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा म्हणजे शंभर टक्के मुद्देमालाचा शोध घेणे शहर पोलिसांना यश आला आहे. यातील दोन तोळे सोने यापूर्वी संशयित शिपायाच्या घरातून पोलिसांनी हस्तगत केले होते. तर उर्वरित सोन्याचे दागिने संशयित शिपाई अमोल आत्माराम मोहिते यांनी रत्नागिरीतील चार ते पाच बँकांमध्ये तारण ठेवून त्यातून तब्बल ३५ लाखाचे कर्ज काढले. परंतु त्याने एका बँकेतून कर्ज काढून दुसऱ्या बँकेचे कर्ज भागवले .