गारुडी मोहल्ला शिवाजीनगर येथे रा. एका 40 वर्षेय महिलेने तीन महिलांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. 45 वर्षीय महिलाही फिर्यादी महिलेची बहिण आहे.45 वर्षीय महिलेचे मूल खेळताना दगड फेकत होते .त्यामुळे टिनाचा आवाज येत होता. सदर फिर्यादी महिलेने मुलाला हटकले या कारणावरून 45 वर्षे महिलेने फिर्यादी महिलेच्या मुलीला थापडानी मारले व 32 वर्षे एका महिलेने फिर्यादी महिलेच्या हातात वर लाकडी काठीने मारले व तीस वर्षे महिलेनी थापडा बुक्क्यांनी मारल्याची तक्रार पोलिसात सदर फिर्यादी महिलांनी दिली आहे .