जळगाव शहरापासून जवळ असलेल्या तरसोद फाट्याजवळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रविवारी (३१ ऑगस्ट) सकाळी १० वाजता कार्यक्रमाच्या जागेचे भूमिपूजन आणि स्तंभ पूजन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिक आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे कार्यक्रमाच्या भव्यतेची झलक दिसून आली.