सेनगांव तालुक्यातील गोरेगांव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने दैत्य भवानीची मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणुकीमध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मागील शेकडे वर्षाची परंपरा गोरेगांव येथील नागरिकांच्या वतीने कायम ठेवून आज गोरेगांव येथील प्रमुख मार्गाने वाजत-गाजत भव्य अशी मिरवणूक काढली आहे.