दुचाकीस्वाराने जोरदार दिलेल्या धडकेत पोलीस उपनिरीक्षकासह त्यांचा मुलगा जखमी झाल्याची घटना आडगाव येथे घडली.फिर्यादी अशोक सोनू जगताप हे नागरी हक्क संरक्षण,नाशिक परिक्षेत्र येथे श्रेणी पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहतात.जगताप हे मोटासायकलीने जात असताना आडगाव रोडवरून घराकडे वळत घेत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात मोटारसायकलस्वाराने त्यांच्या मोटारसायकलीला धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहे.