लातूर -श्रीसंत गोपाळबुवा साखर कारखान्याची पतंजलीकडे पहिली जागरी पावडर पाठवणीलातूर तालुका, मौजे रामेश्वर-जवळा परिसरात उभारण्यात आलेल्या श्रीसंत गोपाळबुवा महाराज शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. या साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामातील उत्पादनाची यशस्वी सुरुवात झाली आहे. देशभरात स्वदेशी उत्पादनांसाठी परिचित असलेल्या पतंजली कंपनीच्या तामिळनाडू येथील कारखान्यासाठी तब्बल 25 टन जागरी (गुळ) पावडर आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता विधिवत पूजा करून रवाना करण्यात आली.