लातूर -रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उदगीर तालुक्यातील बोरगाव आणि धडकनाळ गावांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून,महावितरणच्या वीजयंत्रणेलाही मोठा फटका बसला. महावितरणकडून परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी पडत्या पावसातही युद्धपातळीवर प्रयत्न करून अखेर आज दुपारी साडेचार वाजता दोन्ही गावांचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यास यश मिळाले आहे.