मा.अँड.निलेश हेलोंडे पाटिल अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशन महाराष्ट्र राज्य यांनी अकोला जिल्हा दौरा अंतर्गत तालुक्यातील सातरगाव येथे शुक्रवार दि.७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र रोजगार हमी योजना अंर्तगत चारा लागवडीच्या ठिकाणाची पाहणी केली आणि तालुक्यामध्ये अशी चारा लागवड झाल्यास शेतक-यांच्या खर्चात बचत होऊन उत्पन्न व उत्पादनात वाढ होईल यादृष्टीने सर्वानी प्रयत्न करावे अश्या सुचना केल्या त्यानंतर कान्हेरी गवळी येथील आत्महत्या ग्रस्त कुटूंबाची भेट घेतली.