ठाणे शहरातील वसंत विहार परिसरामध्ये सोनचाफा बिल्डिंगच्या समोर वसंत विहार शाळेच्या बाजूला एका कारला भीषण आग लागल्याची घटना रात्री उशिरा घडली होती. माहिती मिळता चितळसर पोलीस, अग्निशमन दल,आपत्ती व्यवस्थापन कक्ष घटनास्थळी दाखल झाले आणि लागलेले आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवित हानी झाली नाही परंतु कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.