दर्यापूर तालुक्यातील रामागड येथील शेतकरी यादवराव माणिकराव लाजुरकर (६५) यांनी आपल्या शेतातच पोळ्याच्या पूर्वसंध्येला ७ वाजताच्या सुमारास विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांची शेती पूर्ण जलमय झाली असून पूर्णता पीक नष्ट झाले आहे आणि तसेच अंगावर बँकेबरोबरच खाजगी कर्जाचा डोंगर या मनस्थिती मागचा पुढचा विचार न करता चुकीचा निर्णय घेतला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंड असा आप्त परिवार आहे.