इंदिरानगर भागातील पाथर्डी शिवार, हरीविश्व सोसायटी येथे हद्दपार गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेऊन इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल आत्तर शेख राहणार हसन मंजिल, पांडवलेणी याला परिमंडळ दोन उपायुक्त किशोर काळे यांच्या आदेशाने नाशिक शहर व ग्रामीण भागातून हद्दपार केलेले असतानाही कुठलीही परवानगी न घेता तो पाथर्डी शिवार हरीविश्व सोसायटी येथे फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.