सेनगांव तालुक्यातील घोरदरी येथील पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून 4 लाखाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. घोरदरी येथील शेतकरी धोंडीराम भगवान घोगरे हे 16 ऑगस्ट रोजी गावातून शेताकडे जात असताना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मदतीचा धनादेश सेनगांवचे नायब तहसीलदार अनिल सरोदे यांच्या हस्ते मयत शेतकऱ्यांच्या पत्नीस सुपूर्द करण्यात आला.