मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी गावातील सकल मराठा समाजाने मोठा पाठिंबा दिला आहे. आंदोलकांची उपासमार होऊ नये यासाठी अनेक वाहनांमधून भाकरी, चपात्या, चटणी, लोणचे आणि पाण्याच्या बाटल्या मुंबईकडे पाठवण्यात आल्या आहेत.