गेल्या तीन ते चार दिवसापासून पैठण परिसर व तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून व जायकवाडी पाणलोट क्षेत्रातून सतत धार पाऊस सुरू असल्याने जायकवाडी धरणातून बुधवारी व आज गुरुवारी धरणाचे 18 दरवाजे दोन फुटाणे उघडून 38 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पैठण ते नांदेड पर्यंत सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असून यानंतरही पाण्याचा विसर्ग कमी जास्त प्रमाणात करण्यात येईल असा इशारा जायकवाडी धरण अभियंतांनी दिला आहे त्यामुळे गोदाकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे