मेन रोड चिखलदरा येथे मीटिंग मध्ये नाव का घेतले या कारणावरून इसमाला दिनांक २० ऑगस्ट रोजी सायं ५:३० वाजता शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत फिर्यादी शैलेंद्र गुरुबकल पाल वय ४९ वर्ष रा. मेन रोड यांनी चिखलदरा पोलीसात तक्रार दाखल केली. चिखलदरा येथील रेस्ट हाऊस मध्ये आ.रवि राणा यांची मीटिंग होती त्या मीटिंग मध्ये फिर्यादी शैलेंद्र पाल यांनी आरोपी पंकज रमेश पचौरी,अमन जितेंद्र पचौरी,जितेंद्र पचौरी, तिलक मिश्रा, शुभम मिश्रा, व श्याम पंकज पचौरी सर्व रा. मेन चौक चिखलदरा यांचे नाव घेतले.