यावल तालुक्यातील न्हावी गावाजवळ फैजपूर पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत सुमारे २ लाख रुपये किमतीचा ९ किलो ७१७ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने हा गांजा बाळगणाऱ्या मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.