आज ४ सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री ८ वाजता मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव खंडेश्वर येथे बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या योजनेंतर्गत किचन सेट वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यातील लाभार्थ्यांना केवळ दाभा गावातच बोलावण्यात आल्याने गोंधळाचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्रीपासूनच नागरिक रांगेत उभे राहिले असून पहाटेपर्यंत तीन ते चार किलोमीटर लांब रांग लागली होती. चार ते पाच हजारांहून अधिक बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय लाभ घेण्यासाठी उपस्थित आहेत..