ट्रॅक्टर चोरीला गेल्याची तक्रार घेऊन गेलेल्या फिर्यादीला म्हसवड पोलिसांच्या धडक कामगिरीचा चांगलाच फायदा झाला आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या पाच तासात आरोपी जेरबंद करत पोलिसांनी चोरीचा ट्रॅक्टर देखील जप्त केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. म्हसवड पोलीस ठाण्यातून शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता मिळाली. हिंगणी येथील अनिल विष्णू माने यांचा स्वराज्य कंपनीचा साडेआठ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरीस गेला होता.