गणेशोत्सवाचे औचित्य साधून अमरावती महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यंदा गणेशमूर्तीसाठी मातीचा (शाडू) वापर करून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) पासून तयार होणाऱ्या मूर्तींमुळे जलस्रोतांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे अशा मूर्तींच्या वापरास टाळा व सहज विघटन होणाऱ्या मातीच्या गणेशमूर्तींचा स्वीकार करा, असे आवाहन करण्यात आले आहे.