शहरातील जुन्या भागात दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून वीजपुरवठा चार वेळा खंडित झाला. अचानक वारंवार वीज जाण्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. घरगुती कामे, ऑनलाईन क्लासेस तसेच व्यवसायिक व्यवहार ठप्प झाले. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीबाबत महावितरणकडून कोणतीही माहिती दिली गेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, तात्काळ स्थिर वीजपुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे. नागरिकांचा इशारा आहे की समस्