बेलगाव येथील जिल्हा परिषद शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी निवेदने दिली. मात्र, त्याची दखल न घेतल्याने अखेर विद्यार्थ्यांची शाळा चार सप्टेंबर रोजी मेहकर पंचायत समितीत भरवली होती. याच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची बातमी पब्लिक ॲप या प्रसिद्ध माध्यमांवर प्रसिद्ध होताच प्रशासन खडकन जागे झाले.