चिखलदरा तालुक्यातील राजदेवबाबा कॅम्प येथे गस्तीवर असताना वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या प्रेम मुन्ना कास्देकर (वय ३०, रा.तारुबंदा) यांच्या कुटुंबाला आज सकाळी ११ वाजता आमदार केवलराम काळे यांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले.आणि त्यांची पत्नी निर्मला प्रेम कास्देकर यांना वनविभागाकडून ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला.तसेच आमदार यांच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली, आणि लवकरात लवकर नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे वनमंत्री यांना करण्यात आली.