आज सकाळच्या सुमारास रेल्वे रुळावर अचानक वांगणी बदलापूर दरम्यान म्हैस आल्याने अपघात झाला आणि रेल्वे रुळामध्ये म्हैस अडकली.त्यामुळे रेल्वे त्यास ठिकाणी थांबली त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्ष,रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे ट्रॅक मध्ये अडकलेली म्हैस बाजूला करून रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली. मात्र तोपर्यंत रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती याचा त्रास कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना सहन करावा लागला.