कासार्डे येथे गेले कित्येक महिन्यापासून सुरू असलेले सिलिका उत्खनन खूप धोकादायक आहे. सध्या राजरोसपणे उत्खनन सुरू आहे. या सिलिका उत्खननामुळे वातावरणातील प्रदूषणाबरोबरच जलप्रदूषणाचा मोठा धोका या भागासह आजूबाजूच्या भागाला होणार आहे. आणि हे नागरिकांच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे. हे रोखले गेले पाहिजे असे मत पर्यावरण तज्ञ तथा वनशक्ती संस्थेचे स्टॅलिन दयानंद यांनी कणकवली येथे रविवार ८ जून रोजी सायंकाळी ४ वाजता बोलताना सांगितले. काय म्हणाले स्टॅलिन दयानंद पाहूया.