बाळापुर उपविभागातील चोंढी, पिंपळडोळी, अंधार सावंगी, चारमोळी आणि आलेगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील तूर, मूग यांसह इतर पिके पावसाच्या तडाख्याने उध्वस्त झाली आहेत..या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वास्तव परिस्थिती जाणून घेतली.यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना पंचनामे करताना कुठलाही भेदभाव न करता सर्व नुकसानग्रस्त गावांचा समावेश करावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे यांनी व्यक्त केली.