कलारंग आयोजित आमदार महा नाट्य करंडक 2025 च्या मानाच्या करंडकाचे अनावरण आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री आठ वाजता करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सरकारी वकील तथा सल्लागार ॲड प्रसाद पाटील, नाट्य परिषदेचे माजी रायगड शाखा अध्यक्ष संदीप गोठीवरेकर,कामगार नेते दीपक रानवडे, शिवसेना जिल्हा संघटक शैलेश चव्हाण, महिला जिल्हा संघटिका संजीवनी नाईक, जिल्हा महिला आघाडी प्रमुख तृप्ती पाटील, तालुका प्रमुख भाग्यता पाटील, विभागप्रमुख तनुजा मोरे यांच्यासह ज्येष्ठ कलाकार उपस्थित होते.