पातूर तालुक्यातील अंधारसावंगी येथे धर्मातराचे आमिष दाखवून गावकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी देवानंद चतरे यांच्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी ३४ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी देवानंद नारायण चवरे हे एका पायाने अपंग असून, दम्याच्या आजाराने त्रस्त आहेत. गावातील सोनाजी नथ्थू शिंदे यांनी त्यांना थांबवून प्रार्थनेला येण्याचे आवाहन केले. धर्म स्वीकारल्यास पाय व दमा बरा होईल, तसेच पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत रक्कम देऊ.