वांगरगाव उकळी मार्गावर देशी दारू वाहतूक करणारा ताब्यात तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव ते उकळी रोडवर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत पातुर्डा येथील कश्यप गोविंदा सोनवणे यास देशी दारूची अवैध वाहतूक करताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून संत्रा प्रकारची ९० नग देशी दारू, ज्याची किंमत ७२०० रुपये आहे, आणि होंडा शाईन मोटारसायकल, ज्याची किंमत ८० हजार रुपये आहे, असा एकूण ८७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला.