औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील एकाने दिनांक २५ ऑगस्ट सोमवार रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान वगरवाडी येथे येऊन एका महिलेस तिची सासू मारहाण करत आहे अशी माहिती डायल 112 वरून पोलिसांना दिली. यानंतर पोलीस निरीक्षक जीएस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गजानन गिरी वसीम पठाण माधव सूर्यवंशी महिला पोलीस अमलदार तान्हूबाई पाचपुते यांनी वगरवाडी येथे घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली परंतु दिलेली माहिती खोटी निघाली. याप्रकरणी औंढा पोलीस ठाण्यात काशिनाथ येळणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.