सातपूर भागातील मौले सिटी इमारती जवळ मोकळ्या जागेत प्रतिबंधित गांजा अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ऋतिक भाऊराव तुपलोंढे राहणार द्वारकामाई श्रमिक नगर सातपूर, तुषार अरुण सौदाने राहणार श्रमिक नगर व देवराज विशाल जोशी राहणार श्रमिक नगर, सातपूर येथे प्रतिबंधित असलेला गांजा अमली पदार्थ सेवन करताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.