संततधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नांदेपेरा पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शेलू (खुर्द) गावाचा संपर्क तुटला आहे. गावाबाहेर जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग पुरामुळे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.