उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपूण मुंबईवरून भंडारा कडे परतत असताना भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला गुरुवार दि. 11 सप्टेंबरला पहाटे सात वाजता अपघात झाला. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ ही घटना घडली खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे किरकोळ जखमी झाले असून भंडारा येथील त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून सध्या त्यांची प्रकृती धोक्या बाहेर असल्याची माहिती आहे