गणेश विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित, सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी तसेच गणेशभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचगंगा नदी, इचलकरंजी येथे भव्य क्रेन सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे.ही सुविधा माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आली असून, हा सामाजिक बांधिलकीचा अभिनव उपक्रम गणेशोत्सव काळात सातत्याने राबविला जातो. या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवार, दिनांक ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाले.