औंढा नागनाथ तालुक्यातील पाझर तांडा येथे अवैध देशी दारू भिंगरी संत्र्याच्या चोरट्या विक्रीवर औंढा नागनाथ पोलिसांनी दिनांक ३० ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान छापा टाकून लायन पिशवी मधील देशी दारू भिंगरी संत्राच्या सीलबंद बावीस बॉटल ज्याची किंमत १७६० रुपये असा मुद्देमाल जप्त करून पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले यांच्या फिर्यादीवरून बबन राघोजी राठोड वय ५५ वर्ष राहणार पाझर तांडा यांच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक ३० ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल केला आहे