साबरबंधचे ग्रामपंचायत सदस्य देवचंद चांदेवार यांना सावरबंध येथे मोहन मेडिकल स्टोअर येथे शुक्रवार दि.5ला सकाळी11वाजता जिवे मारणारा हल्लेखोर शेरसिंग चव्हाण यांच्यावर पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी देवचंद चांदेवार यांनी साकोली येथील विश्रामगृहात शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबरला रात्री आठ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.सामाजिक कार्यकर्ता रामू लांजेवार,शिवसेना शिंदे गटाचे राधेशाम मुंगमोडे नरेंद वाडीभस्मे,बंडू शेंडे,पुष्कर करंजेकर,सुमित लंजे यांची उपस्थिती होती