भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी, अश्या मागणीचे निवेदन आम. नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. ज्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आम. भोंडेकर यांच्या द्वारे दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान पाठविण्यात आलेल्या निवेदनात ते म्हणाले आहे की, गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे शेतपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.