भद्रावती तालुक्यात ढगफुटी सदृष्य पाऊस आल्याने माजरी गावालगत असलेल्या शिरना नदिला पुर आला.या पुरामुळे माजरी-कोंढा-भद्रावती मार्ग बंद पडून वाहतुक खोळंबलेली आहे.शिरना नदिच्या पुराचे पाणी नदिकाठालगतच्या शेतात शिरल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे नुकसान झाले आहे.सकाळपासून तालुक्यात पावसाने ऊसंत घेतली असली तरी पावसाची शक्यता अद्यापही कायम आहे.