सेनगांव तालुक्यातील खिल्लार येथील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे कर्तव्य बजावत असलेले शिक्षक ज्ञानेश्वर काळुराम चव्हाण हे आपल्या कुटुंबीयांसह गणेशोत्सवासाठी हिंगोली कडे येत असताना बेपत्ता झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तर हे शिक्षक कुटुंब गोंदवले येथे सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली. शिक्षक ज्ञानेश्वर काळुराम चव्हाण हे पत्नी व दोन मुलांसह हिंगोलीच्या दिशेने येत असताना अचानक त्यांचे मोबाईल फोन बंद झाले तर त्यांचे शेवटचे लोकेशन हे चिपळूण येत आहे.