नवी मुंबई महानगरपालिकेचे खालापूर तालुक्यातील मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून याठिकाणी महापालिकेच्या वतीने सोमवार, ८ सप्टेंबर रोजी जलपूजन करण्यात आले आहे. यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने ऑगस्ट महिन्यातच मोरबे धरण पूर्ण भरले आहे.पूजन झाल्यानंतर विसर्ग करण्यात आला. मोरबे धरणाचे जलपूजन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.