महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाच्या वतीने आज, 4 सप्टेंबर दुपारी 3 वाजता,गांधी चौक, चंद्रपूर येथे ओबीसी समाजाचा वतीने शासन निर्णयाची होळी करून जोरदार निषेध आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी मराठ्यांचे ओबीसीकरण हा ओबीसी समाजावर अन्याय असल्याचा आरोप करत सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली.