वैराग पोलीस ठाणे हद्दीतत शहानवाज मुल्ला राहणार बार्शी सॅमसंग अल्ट्रा व स्वप्निल चव्हाण राहणार वैराग ओप्पो यांचे मोबाईल वैराग मध्ये चोरी झालेले होते. व ते जवळपास एक लाख 30 हजार रुपये किमतीचे चोरीस गेलेले मोबाईल वैराग पोलीस ठाणे कडील पोलीस कॉन्स्टेबल 1449 शिवलिंग कांबळे यांनी बुद्धी कौशल्याचा वापर करून तसेच सायबर पोलिसांचे मदतीने हस्तगत केले. हस्तगत केलेले मोबाईल वैराग पोलीस निरीक्षक कुंदन गावडे साहेब यांच्या हस्ते संबंधित मोबाईल धारकांना सुपूर्त करण्यात आले.