बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाट परिसरात रात्री धाडसी चोरीची घटना घडली. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धावत्या पिकअप वाहनाची ताडपत्री फाडून त्यातील रेशीमच्या वीस पोत्यांवर हात साफ केला. या चोरीत अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, रेशीम व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. बीड शहरातील रेशीम कोष बाजारातील व्यापारी बाबुभाई यांचा माल पिकअप वाहनातून मांजरसुंबा पाली घाट परिसरातून जात असताना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हात साफ केला