रावेर तालुक्यात भोर हे गाव आहे. या गावातील रहिवासी मोहन लक्ष्मण गायकवाड वय ५५ यांनी कसले तरी विषारी औषध प्राशन केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.