रावेर शहरातून बऱ्हाणपूर जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर रुची मोटर्स आहे. येथे एका २८ वर्षीय तरुणीस विनय समाधान मेढे याने सांगितले की तू मला ओळखत नाही का असे सांगून तिला स्पर्श करीत तिच्या मनाला उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तिच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडली व नुकसान केले. व या तरुणीचा विनयभंग केला. तेव्हा रावेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.