मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घ्यावे, या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या या लढ्याला राज्यभरातून मोठा जनसमर्थन मिळत असून राजधानी भगवीमय झाली आहे. या पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने आज दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले. महागाव शहरातील नागपूर–तुळजापूर राज्य महामार्गावर मराठा बांधवांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत शासनावर तीव्र प्रहार केला.