पाथर्डी फाटा, पिंपळगाव खांब येथील गणेश नगर येथे बिबट्याचा वावर मोबाईल कॅमेरा कैद झाला आहे आज दिनांक चार सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान पाथर्डी फाटा पिंपळगाव खांब येथील एका शेतातून बिबट्या मोबाईल कॅमेरात कैद झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपासून वन्य प्राण्यांच्या भक्षणासाठी वारंवार भर लोकवस्तीत बिबटे आढळून आले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला कैद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.