वाशिम जिल्ह्यात सर्वप्रथम मिरवणुकीत डीजे नाकारणाऱ्या एकता मित्र मंडळ धनज बुद्रुक च्या गणेश मंडळाला पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता भेट दिली यावेळी त्यांनी या गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीची आरती केली आणि या गणेश मंडळांनी डीजे मुक्त मिरवणूक काढण्याचा जो संकल्प केला आहे त्या संकल्पनेच अनुज तारे यांनी कौतुक केले. यापुढे दरवर्षी गणेशोत्सवाची मिरवणूक डीजे न लावता पारंपारिक वाद्यासह काढावा त्यासाठी लहान मुलांना सहभागी करून घ्यावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.