कोल्हापूर बेंचने राहुल दाजी लांडगे (वय ३३, रा. सावळेश्वर, ता. मोहोळ) यास मोहोळ पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर ठरविली आहे. त्यास तत्काळ सोडण्याचे आदेश न्यायमूर्ती एम. एस.कर्णिक व शर्मिला देशमुख यांनी दिले आहेत, अशी माहिती अशी माहिती ॲड. रितेश थोबडे यांनी आज गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिली आहे. संशयित आरोपी राहुल व त्याच्या पत्नीत घरगुती वाद होत असल्याने तो पत्नीस नांदायला घेऊन जात नव्हता.